Header Ads

ad

संविधान बचाव रॅलीत युवा नेत्यांचा एल्गार

मुंबई,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
दिल्लीत भरदिवसा समाजकंटकांकडून संविधान जाळण्यात आले. या कृतीचा निषेध करण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी तसेच संविधानाच्या सन्मानासाठी आज युनायटेड यूथ फ्रंटच्यावतीने ‘संविधान बचाओ रॅली’ ची सुरुवात मुंबईतून झाली. या रॅलीत गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विदयार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना कन्हैयाकुमार म्हणाले, की केंद्र सरकारने धार्मिक मुद्द्यावरुन सुरू केलेले राजकारण देश बुडवण्याच्या दिशेने चालले आहे. त्यामुळे देश वाचवण्यासाठी संविधान वाचवणे गरजेचे आहे. यावेळी हार्दीक पटेल म्हणाले, की आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्यांनी सुरू केलेले राजकारण वेदनादायी आहे. तसेच संविधानाचा बचाव करून केंद्रातले धर्मांध सरकार पायउतार करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
दादरमधील राजगृह ते चैत्यभूमी असा या रॅलीचा प्रवास आहे. ‘हम उतरे मैदान में, संविधान के सन्मान में’ असा नारा देत 14 युवा संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. या रॅलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, मानवी हक्क अभियानचे प्रदेशाध्यक्ष दत्ता आव्हाड आणि इतर संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.
या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण देशात संविधानाचा जागर करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांची कार्यभूमी असलेल्या मुंबईतून झाली. संविधानात्मक विचार टिकवण्यासाठी मोठी युवाशक्ती आज एकत्र आली.

No comments

Thank you for your feedback.