Header Ads

ad

कोर्टाला समलैगिकतेपेक्षाही राम मंदिराचा विषय कमी महत्वाचा? - ॠतुंभरा

नागपूर,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
राम मंदिरा आंदोलनातल्या नेत्या साध्वी ॠतुंभरा पुन्हा कडाडल्या आहेत. ऐकेकाळी राम मंदिर आंदोलनातल्या ॠतुंभरा या मुलूख मैदानी तोफ होत्या. अनेक वर्षानंतर त्या नागपूरात राम मंदिर आंदोलनासाठी आल्या आणि पुर्वीच्याच आवेषात त्यांनी चौफेर हल्लाबोल केला. कोर्टाला राम मंदिराचा मुद्दा हा समलैंगिकतेच्या विषयापेक्षाही कमी महत्वाचा वाटतो का असा सवाल त्यांनी केला. राम मंदिराच्या विषयाला प्राधान्य न देणं हा सर्व हिंदू समाजाचा अपमान आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
साध्वी ॠतुंभरा म्हणाल्या, राम मंदिराविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आग्रही भूमिका मांडलीय. त्यांची भूमिका म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदेश समजावा आणि राम मंदिरासाठी अध्यादेश काढावा अशी मागणीही त्यांनी केला.
राम मंदिरासाठी आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे. कारसेवकांनी आत्तापर्यंत यासाठी खूप बलिदान दिलं आणि निर्णायक वेळ आली आहे. आताही त्यागासाठी तयार राहा असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केलं. त्या आधी सरसंघचालक मोहन भागवतही यांनीही आपल्या भाषणात सरकारवर दबाव आणा असं आवाहन केलं.
काय म्हणाले सरसंघचालक?
अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण व्हावं यासाठी आम्ही तीन दशकं संयम ठेवला. आता आमचा संयम संपला आहे. ’अब लडना नही, अडना है’ अशी घोषणा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. नागपूरात विहिंपने आयोजित केलेल्या हुंकार सभेत ते बोलत होते. राम मंदिरासाठी जर सर्वोच्च न्यायालयाला वेळ नसेल तर सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढावा अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले, राम मंदिर हे सर्व भारतीयांचं स्वप्न आहे. आम्ही कायद्यावर विश्‍वास ठेवणारे आहोत. पण न्यायदानाला उशीर करणं म्हणजे न्याय नाकारणं आहे असं शिकवलं जातं. असं असताना राम मंदिरासारख्या प्रश्‍नाला का प्राधान्य दिलं जात नाही असा सवालही त्यांनी केला.
भागवत पुढं म्हणाले, राम मंदिर हा राजकारण किंवा निवडणुकीचा विषय नाही. तर कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. बाबराने मंदिर ताडून तिथे एक ढाचा उभा केला होता. बाबराशी इथल्या मुस्लिमांनी नातं जोडू नये. तो परकीय आक्रमक होता. अयोध्येतल्या त्या जागी मंदिर होतं हे पुरात्व खात्याच्या उत्खननात सिद्ध झालंय.
आता वाद हा फक्त जागेच्या मालकीचा आहे. तो लवकरात लवकर निकालात काढला पाहिजे. राम मंदिरासाठी आता लढायचं नाही तर बुद्धीने निर्णय करायचा आहे. राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यासाठी काय करायचं याचा निर्णय सरकारनं करावा. देशभर जाऊन जनजागृती करा, लोकांना विषय समजून सांगा असं आवाहनही त्यांनी केलं.
राम मंदिरासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे. कारण लोकांच्या दबावात खूप मोठी शक्ती असते आणि ती शक्ती सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडते असं सांगत त्यांना पंतप्रधान मोदींना निर्णयाक इशारात दिला आहे.

No comments

Thank you for your feedback.