Header Ads

ad

मोहन भागवतांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 10 मुद्दे

नागपूर,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण व्हावं यासाठी आम्ही तीन दशकं संयम ठेवला. आता आमचा संयम संपला आहे. ’अब लडना नही, अडना है’ अशी घोषणा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. नागपूरात विहिंपने आयोजित केलेल्या हुंकार सभेत ते बोलत होते. राम मंदिरासाठी सर सर्वोच्च न्यायालयाला वेळ नसेल तर सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढावा अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
या भाषणातले मोहन भागवत यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे...
- आम्ही राम मंदिराची मागणी करतोय कारण भारत हा एक स्वतंत्र देश आहे. जन्मभूमी एकच असते. आम्ही जेव्हापर्यंत देशांचे मालक नव्हतो तेव्हापर्यंत आम्ही हा विषय बोलत नव्हतो, पण आता देशांचे मालक झाल्यावरच आम्ही बोलतोय.
- राम मंदिर व्हावे यासाठी सरकारवर दबाव आणा.
- एक वर्षा आधी मी म्हणाले होतो की धैर्य ठेवा आता मी म्हणतो आग्रह करा
- न्यायालयाने राम मंदिर हा प्राध्यान्यक्रम नाही हे सांगितल्यानेही विलंब झाला.
- जमिनीखाली मंदिर आहे हे सिद्ध झाले त्याला तोडूनच विवादीत ढाचा निर्माण झाला.
- व्ल्ेूग्म ्ात्रब् ग्े रल्ेूग्म ्ाहग् हे का कायद्याच्या पुस्तकात शिकवतात.
- आता आम्हाला संकेत मिळाले की न्यायदानाच्या यंत्रणेसाठी हा विषय प्राध्यान्य क्रम नाही.
- राम मंदिरासाठी कायदा व्हावाच.
- जर कुणी एक सरकारमध्ये आहे आणि राम मंदिर व्हावे यासाठी त्यांना काही करता येत नाही तर लोकांचा आग्रह त्यांना राम मंदिर तयार करण्यासाठी तयार करेल.
- लवकरात लवकर रामजन्म भुमीवर राममंदिर व्हावे. नाहीतर आता भव्य जनजागरण होणार.

No comments

Thank you for your feedback.