Header Ads

ad

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिक भयभीत

हिंगोली,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
जिल्ह्यातील वसमत, औंढा-नागनाथ तालुक्यातील काही गावात शनिवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने भूमापक केंद्रावर धक्क्याची नोंद झाली नसल्याचे सांगितले आहे.
जिल्ह्यातील सीरळी, पांगरा शिंदे, पिंपळदरी, कुपटी, आमदरी आदी गावात शनिवारी रात्री 10.17 वाजताच्या सुमार जमिनीतून आवाज येऊन धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांनी ताबडतोब घराबाहेर धाव घेतली. तर आमदरी गावात दोन घराची भिंती कोसळून काही घरांचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही भूकंपाच्या हादर्‍याने नागरिक भयभीत झाले आहेत. या भागातील नागरिक भूकंप आणि जमिनीतील गूढ आवाजाने हैराण आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला असता भूमापक केंद्रावर कोणतीही नोंद झालेली नसल्याचे सांगितले. या भागात अधून मधून गूढ आवाजाचे सत्र सुरूच आहे. प्रशासनाचे अधिकारी केवळ भूकंप झाल्यानंतर काही वेळाने दाखल होतात आणि नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करून निघून जातात, अशी तक्रार नागरिक करत आहेत. अनेकदा गूढ आवाज होऊनही त्याचे कारण अजूनही न शोधल्याने नागरिक संबंधित विभागावर संतप्त झाले आहेत.

No comments

Thank you for your feedback.