Header Ads

ad

पुण्यात एकाच वेळी 2 हजार 253 जणांचा योगा करत विक्रम

पुणे,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
पुण्यात एकाच वेळी 2 हजार 253 जणांनी अ‍ॅब्डॉमिनल प्लँक हा योग प्रकार करुन नवीन विक्रम नोंदवला. प्रसिद्ध अभिनेत्री आणि फीटनेस प्रेमी शिल्पा शेट्टी या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी होती. तिनंही या विश्‍वविक्रमात सहभाग घेतला. शिल्पा शेट्टीसह 2 हजार 253 लोकांनी एक मिनिट अ‍ॅब्डॉमिनल प्लँक हा योग प्रकार करुन त्याची गिनीज बुक ऑॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली.
प्लँकेथॉन असं या उपक्रमाचं नाव होतं.उत्तम आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला होता. पुण्यातील एएफएमसी ग्राउंड येथे हा नवा जागतिक विक्रम रचण्यात आला.

No comments

Thank you for your feedback.