Header Ads

ad

राष्ट्रभाषा प्रचार समितीचे कुलूप तोडल्याने 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 5 जण अटकेत

वर्धा,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
संस्थेचे माजी पंतप्रधान सूर्यवंशी चौधरी यांनी सहकार्‍यांसह मिळून राष्ट्रभाषा प्रचार समिती कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला. याप्रकरणी सूर्यवंशी यांच्यासह 25 जणांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन 3 जणांना अटक करण्यात आले आहे.
नवीन निवडणुकीत अनंतराम त्रिपाठी यांची कार्यकारिणी निवडून आली होती. त्यामुळे त्रिपाठी यांनी पदभार सांभाळला होता. त्यांचे कामकाज चालू असताना सुर्यवंशी सहकार्‍यांना घेऊन त्या ठिकाणी आले. अध्यक्षांनी लावलेले कुलूप परवानगी न घेता तोडले.
याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष अनंतराम त्रिपाठी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सूर्यवंशी चौधरी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला.

No comments

Thank you for your feedback.