Header Ads

ad

’नेट’ परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बिहारचे केंद्र

जालना,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
जालन्यातील विद्यार्थ्यांना नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेसाठी थेट बिहारमधील परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या नेट या प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. जालना येथील दोन परीक्षाथींर्ना याचा फटका बसला असून त्यांना महाराष्ट्रातील औरंगाबाद ऐवजी थेट बिहारमधील औरंगाबादचं परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे. हॉल तिकीटवरील हे परीक्षा केंद्र पाहून या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता आहे.
देशभरात 20 डिसेंबर रोजी होणार्‍या नेट परीक्षेसाठी जालन्यामधील तुकाराम पिठोरे आणि पूजा काकड यांनी फॉर्म भरला होता. ज्यात त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक, नांदेड व परभणी या चार शहरांची पर्यायी निवड केली होती. मात्र महाराष्ट्रातील शहरांचे पर्याय दिले असताना या विद्यार्थ्यांना थेट बिहारमधील औरंगाबाद येथील परिक्षा केंद्र दिल्याने परीक्षा देण्याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मानव संसाधन मंत्रालय व यूजीसीकडे या विद्यार्थ्यांनी मेल द्वारे आपली तक्रार नोंदवली असली तरी त्यासंबंधी अजून पर्यंत दखल घेण्यात आलेली नाही.

No comments

Thank you for your feedback.