Header Ads

ad

राम जन्मभूमी ही देशाच्या श्रद्धेचा व आस्थेचा विषय - भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष

शिर्डी,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
राम मंदिराचा मुद्दा हा काय नव्याने निर्माण झालेल्या मुद्दा नाही. या देशातील जनतेने, संघ परिवाराच्या लोकांनी तसेच देशातील साधुसंतांनी आणि भाजपच्या समर्थकांनी फार पूर्वीपासून काढलेला हा मुद्दा आहे. राम जन्मभूमी ही देशाच्या श्रद्धेचा व आस्थेचा विषय आहे. सर्व लोकांच्या अस्मितेतून मंदिर तयार झाले पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी म्हटले आहे. शिर्डीमध्ये आले असता ते बोलत होते.
राम मंदिर झाले पाहिजे ही या देशातील जनतेची इच्छा आहे. बर्‍याच वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे. उद्धव ठाकरे तेथे मंदिराच्या समर्थनार्थ गेले आहेत. त्यांचे स्वागत असल्याचेही जाजु यांनी म्हटले आहे. तसेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती फार पूर्वीपासून आहे. शिवसेना आणि अकाली दल हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात जुने मित्र आहेत. 1984 पासून ही युती चालू असल्याचे ते म्हणाले. आता देश विकासाच्या दिशेने जात आहे. मोदीजी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश ज्या प्रकारे घोडदौड करत आहे. त्यामध्ये सर्व मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहतील, असा विश्‍वास जाजू यांनी व्यक्त केला.
पाच राज्यांमध्ये चालू असलेल्या निवडणुकांवरही त्यांनी मत व्यक्त केले. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष गेल्या 15 वर्षांपासून सत्तेमध्ये आहे. परंतु, तेलंगणा राज्य भाजपसाठी कमकुवत असल्याचे ते म्हणाले. सत्ता असलेली 3 राज्ये आणि मिझोराममध्ये भाजपची सत्ता निर्विवादपणे येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मित्रपक्षांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्क्याने विजय होईल. पाचपैकी 4 राज्यांमध्ये आमचेच सरकार येईल, असे जाजू म्हणाले.

No comments

Thank you for your feedback.