Header Ads

ad

ग्रामसेवक बेंगाळ यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

हिंगोली,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील ग्रामसेवक मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून याबाबतचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने काढले आहेत. त्यानुसार रविवारी सीआयडीच्या अधिकार्‍यांनी सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे जुगारअड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला होता. यामध्ये पोलिसांच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले होते. यामध्ये ग्रामसेवक गोपाळराव बेंगाळ यांचाही समावेश होता. मात्र बेंगाळ यांनी आपण फिरण्यासाठी आलो होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही त्यांना पोलिस वाहनात बसवून सेनगाव येथे आणले जात होते. यावेळी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. पोलिस व गावकर्‍यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर सुमारे पंचवीस तासांनी गावकर्‍यांनी बेंगाळ यांचा मृतदेह ताब्यात घेतला. बेंगाळ यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. दरम्यान, पोलिस वाहनामध्ये बेंगाळ यांचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक एस.आर.जगताप यांच्या पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यामध्ये आता सीआयडीकडून काही जणांचे जवाब देखील नोंदवले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

No comments

Thank you for your feedback.