Header Ads

ad

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करणार्‍या शिक्षण संस्थांची समाजाला गरज - विनोद तावडे

पालघर,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
तारापूर शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सवी सोहळा सावे विद्यालयाच्या प्रांगणात पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन आणि संस्थेच्या संकेतस्थळाचा शुभारंभ शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील तारापूर गावात ’तारापूर एज्युकेशन सोसायटी’ ही स्वातंत्र्यपूर्व काळातील शैक्षणिक संस्था आहे. तारापूर आणि परिसरातील मुलांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी परिसरातील विविध जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापन केली होती. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून संस्थेची आजवरची वाटचाल सुरू आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने कार्य करणार्‍या शिक्षण संस्थांची समाजाला खरी गरज आहे. तारापूर एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्था समाजाची ही गरज पूर्ण करून सामाजिक परिवर्तनाचे कार्य करत आहेत, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या सोहळ्यात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात तावडेंनी ङ्खसंवाद शिक्षणमंत्र्यांशी (हितगुज विद्यार्थ्यांशी)ङ्ग या कार्यक्रमांतर्गत उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणामधील नवनवीन बदलांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तसेच कौशल्याधारीत अभ्यासक्रमांची निवड करून आपले करिअर घडवावे, असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच आपली आवड आणि गुणवत्ता लक्षात घेवून आपला विकास साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार राजेंद्र गावीत, पास्कल धनारे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हरेश्‍वर दामोदर सावे यांच्यासह शिक्षणप्रेमी, नागरिक, माजी विद्यार्थी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Thank you for your feedback.