Header Ads

ad

ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला पाठिंबा दर्शवण्यासाठी खारघरमध्ये महाआरतीचे आयोजन

रायगड,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
श्रीराम मंदिर निर्माणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आहेत. त्यांच्या या अयोध्या दौर्‍याला पांठिबा दर्शवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने खारघर सेक्टर 11 मधील महाकाली मंदिरात महाआरती करण्यात आली. यावळेस मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे यांनी अयोध्येत दाखल होत शरयू नदीची महाआरती केली. याचवेळी देशभरातील राम मंदिरातून महाआरतीचे आणि प्रभु श्रीरामचंद्रांच्या जयघोषाचे सूर दुमदुमले. पनवेल मधल्या खारघर सेक्टर 11 मधील महाकाली मंदिरात भव्य स्वरूपात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला महिलांच्या भजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर श्रीराम जयराम आणि राम कृष्ण हरीचाही गजरही करण्यात आला. या महाआरतीसाठी खारगरमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. राज्यातील शिवसैनिक एकदिलाने, एकजुटीने हा लढा यशस्वी करतील, असा विश्‍वास खारगर शिवसेना प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी व्यक्त केला.

No comments

Thank you for your feedback.