Header Ads

ad

खामगांवच्या व्यापार्‍याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल, सावकार फरार

बुलडाणा 24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
खामगांवचे फटाका व्यापारी गोपाल अग्रवाल याच्यांविरुद्ध बाबुराव नामदेवराव सोळंके (रा. सजनपुरी) यांनी अवैध सावकारी करत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे केली होती. यानंतर अग्रवालच्या कार्यालयाची झडती घेतली असता त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्याविरोधात खामगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गोपाल अग्रवाल फरार आहेत.
जिल्हा उपनिबंधकांच्या शिफारशीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. सोळंके यांनी व्यापारी अग्रवाल यांच्याविरुद्ध जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांच्याकडे अवैध सावकारीची तक्रार केली होती. या तक्रारीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 96 अंतर्गत गोपाल अग्रवाल यांच्या भाजी मार्केट फरशी, खामगाव येथील कार्यालयावर 17 नोव्हेंबरला झडती कारवाई करण्यात आली. यावेळी तपासणीनंतर पंचनामा करण्यात आला.
या कारवाईत अवैध कागदपत्रे, कोरे चेक, देयक व खरेदी खत मिळाली आहेत. त्यावरुन अग्रवाल अवैध सावकारी करत असल्याचे समोर आले आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात अजहर शेख करत आहे.

No comments

Thank you for your feedback.